अटल सेतूवर एनएमएमटीची धाव; बसने मुंबई गाठता येणार, तिकीटदर अद्याप अनिश्चित

उरणवरून अटल सेतूवरून बसने थेट मुंबई गाठता येणार आहे. नवी मुंबई महापालिकेचा परिवहन उपक्रम अर्थात एनएमएमटीकडून अटल सेतूवरून बस सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

1 min read

उरण : तिसऱ्या मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या उरणवरून अटल सेतूवरून बसने थेट मुंबई गाठता येणार आहे. नवी मुंबई महापालिकेचा परिवहन उपक्रम अर्थात एनएमएमटीकडून अटल सेतूवरून बस सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून बेस्टकडून या मार्गावरून बस सुरू करण्यासाठी चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे अटलसेतूवरून सर्वसामान्यांनाही प्रवास करणे शक्य होणार आहे.

एनएमएमटीने या मार्गावरून बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नेरुळ ते खारकोपर बसचा मार्ग बदलणार आहे. सध्या नेरुळ ते खारकोपर, उलवे नोड मार्गावर धावणाऱ्या ११५ क्रमांकाच्या बसमार्गात बदल करून ही बस आता नेरुळपासून अटल सेतूमार्गे मंत्रालयापर्यंत चालवली जाणार आहे. नेरुळमधून उलवेमार्गे गव्हाण फाट्यावरून जासई आणि तिथून सागरी सेतूमार्गे ही बस मंत्रालयात पोहोचेल. सध्या या मार्गावरून सकाळी आणि संध्याकाळी अशा दोनच फेऱ्या असतील.